कोल्हापूर : धामोडमध्ये ग्रामपंचायतीसाठी चुरशीने ८९ टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर : धामोडमध्ये ग्रामपंचायतीसाठी चुरशीने ८९ टक्के मतदान

धामोड (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीसाठी चुरशीने ८९ % मतदान झाले असुन सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे .

धामोड ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत झाली. निवडणूक एकूण पाच प्रभागात लढत झाली आहे आज सरपंच पदासह चौदा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे . ही लढत दोन गटात झाली आहे. आज मतदानादिवशी ३८८६ मतदानापैकी ३४३४ मतदान झाले असून धामोड ग्रामपंचायतीसाठी ८९% मतदान झाले आहे .

कोल्हापूर : चांदे ग्रामपंचायतीसाठी ९५% मतदान

चांदे ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासह दहा जागांसाठी दुरंगी लढत झाली. यावेळी चांदे ग्रामपंचायतीसाठी ९५% मतदान झाले आहे .

केळोशी खुर्द : केळोशी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीसाठी सात सदस्य व सरपंचपदासाठी काटाजोड लढत झाली आहे . केळोशी खुर्द साठी सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे . पण सरपंच पदासाठी लढत झाली असुन येथे ९२% मतदान झाले आहे. धामोड चांदे व केळोशी खुर्द येथे शांततेत मतदान पार पडले असुन कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा;

Back to top button