सांगली : आटपाडी तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीसाठी चुरशीने मतदान | पुढारी

सांगली : आटपाडी तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीसाठी चुरशीने मतदान

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. झरे येथे मतदान केंद्रावर मोठा वाद झाला. परंतु हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. दिघंची, पळसखेल, पडळकरवाडी, कौठूळी येथे किरकोळ बाचाबाची झाली. अन्यत्र मतदान शांततेत सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रामुख्याने भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये लढत होत आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर समर्थक तानाजीराव पाटील यांच्यातच खरा सामना होत आहे.

खरसुंडी येथे दोन्ही काँग्रेसमुळे आणि दिघंची येथे राष्ट्रवादीमुळे चुरशीची तिरंगी लढत आहे. तालुक्यातील आवळाई, गोमेवाडी, कुरुंदवाडी, माळेवाडी, पारेकरवाडी, तडवळे, उंबरगाव, पावाडी, खरसुंडी, पुजारवाडी(दि), गळवेवाडी, पिंपरी बु, बाळेवाडी, जांभुळणी, कौठुळी, पडळकरवाडी, घाणंद, हिवतड, कामथ, पळसखेल, दिघंची, लिंगीवरे, राजेवाडी, वलवन, झरे येथे शांततेत मतदान सुरू होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button