अजितदादा विदर्भात आल्याचा आम्हाला आनंद : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

अजितदादा विदर्भात आल्याचा आम्हाला आनंद : उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळी अधिवेशनाच्या चहापान कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधिमंडळाच्या बैठकीमधील दोन महत्त्वाच्या निर्णयाबाबत त्यांनी माहिती दिली. विशेषत: अजित पवार विदर्भात आले याचा आम्हाला आनंद झाला असे देखील ते यावेळी म्हणाले.

तीन वर्षानंतर विरोधकांना नागपूरात येण्याची संधी आमच्यामुळे मिळाली असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. अजितदादांना विदर्भाची आठवण आली याचा आम्हाला आंनंद वाटला, असं मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान त्यांनी नवीन लोकायुक्त विधेयक अधिवेशनात मांडणार आहोत अशी माहिती दिली. या मुख्यमंत्री, मंत्रीमंडळही लोकायुक्त कायद्यअंतर्गत येणार असल्याचे देखील ते म्हणाले.

महापुरुषांवरील चुकीच्या वक्तव्यांवरुन उफाळलेल्या वादावर देखील त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. शिवरायांच्या वंशजांकडे पुरावे मागणारे अपमानाबद्दल बोलत आहेत. वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे ठाकरेंच्या व्यसपीठावर आहेत. आंबेडकरांचा जन्म माहित नसणारे अपमानाबद्दल बोलत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलत असताना त्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, काही पक्षाचे नेते जाणीवपूर्वक सीमावाद पेटवत आहेत असा आरोप फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

हेही वाचा

Back to top button