कोल्हापूर : मानबेट ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध : सरपंचपदी संभाजीराव कांबळे | पुढारी

कोल्हापूर : मानबेट ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध : सरपंचपदी संभाजीराव कांबळे

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील मानबेट या दुर्गम भागातील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. थेट सरपंचपदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभाजीराव भाऊ कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, या परिसरातील पडसाळी पाठोपाठ मानबेट या धामणी काठावरील दुसऱ्या गावाची निवडणुकही बिनविरोध झाल्याने तालुक्यातील निवडणूक लागलेली धामणी काठची दोन्ही गावे आता शांत झाली आहेत.

धामणी पाटबंधारे प्रकल्प ज्या गावात बांधण्यात येत आहे. त्या मानबेट ग्रुप ग्रामपंचायतमध्ये राई, कंदलगाव, चौके, मांडवकरवाडी या वाड्या- वस्त्यांचा समावेश आहे. गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.

बिनविरोध सदस्य असे, जयसिंग पाटील, रूपाली सुतार, सविता कांबळे, संतोष घुमे, दिपाली चौकेकर, केरबा लाड, सुरेखा कदम, रतन गुरव, संदीप  बाणे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सागर रानमाळे (आकनुरकर ) यांनी काम पाहिले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एम जी गुरव, शिवाजी गोरुले, लक्ष्मण घुमे, शांताराम पाटील, कृष्णात आरबुणे, बाळू मांडवकर, संजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : 

Back to top button