कोल्हापूर : औरवाड ग्रामपंचायतीच्या ३ सदस्यांची बिनविरोध निवड

कवठेगुलंद: पुढारी वृत्तसेवा : औरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 13 जागांपैकी 3 जागा बिनविरोध निवड करण्यात आली. आता 10 जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये चार वार्ड असून, वार्ड क्रमांक 3 मधून प्रशांत चंद्रकांत मंगसुळे व विशाल विजय दुग्गे आणि मंगल राजाराम गावडे या 3 जणांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
औरवाड गावात तीन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्यांच्यात मोठी रस्सीखेच होणार आहे.
हेही वाचलंत का ?
- कोल्हापूर : नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर गुडाळवाडीतील शाळेला तरुणाची रशियातून मदत
- सीमाप्रश्नावरून संसदेत प्रचंड गदारोळ, खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदारामध्ये वाक् युद्ध
- कर्नाटकात मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? : बाळासाहेब थोरात