कोल्‍हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक : ‘सुप्टा’तील ३ उमेदवार विजयी | पुढारी

कोल्‍हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक : 'सुप्टा'तील ३ उमेदवार विजयी

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक मतमोजणी विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोन येथे सुरु झाली आहे. पहिला टप्प्यात आधिसभा विद्यापीठ शिक्षक गटात शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटना (सुप्टा) तीन उमेदवार विजयी  झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे…

१. प्रा (डॉ.) शशीभूषण बाबासाहेब महाडिक (संख्याशास्त्र)
२. प्रा (डॉ.) शंकर पोशट्टी हंगीरगेकर (रसायनशास्त्र)
३. प्रा. (डॉ.) माधुरी वसंत वाळवेकर (प्राणीशास्त्र)

तसेच मानसशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. विकास मिणचेकर, डॉ. विनायक होणमारे , डॉ. विजयमाला चौगुले निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू आहे

हेही वाचा : 

Back to top button