कोल्‍हापूर : कबनूर ग्रामस्‍थांनी वाजत-गाजत कचरा टाकला थेट ग्रामपंचायत कार्यालयात | पुढारी

कोल्‍हापूर : कबनूर ग्रामस्‍थांनी वाजत-गाजत कचरा टाकला थेट ग्रामपंचायत कार्यालयात

कबनूर (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : कबनूर डेक्कन रोडवरील मातंग समाज मंदिर शेजारील कचरा ग्रामपंचायतीने महिनाभर उचलला नाही. त्‍यामूळे कुंदन आवळे यांच्या नेतृत्वावाखाली संतप्त नागरिकांनी कचरा पोत्यामध्ये भरुन मिरवणूक काढत वाजत-गाजत ग्रामपंचायत कार्यालयात टाकला.

ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील व ग्रा. वि. अधिकारी गणपत आदलिंग याना कुंदन आवळे यानी चांगलेच धारेवर धरले व ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कुंदन आवळे व उपसरपंच सुधीर पाटील यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यामुळे कांही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.

कबनूरमध्ये वेळच्यावेळी कचरा उठाव होत नाही. मातंग समाज मंदिर शेजारी कचऱ्याचे ढीग लागले होते. कचरा कुजून दुर्गंधी सुटली होती. समाज मंदिरात अंगणवाडी भरते. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला जाग याववी यासाठी कचरा उचलून तो थेट वाजत- गाजत नेला. यावेळी सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाविरोधातील घोषणा देण्यात आल्‍या. या आंदोलनात मातंग समाजातील कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

हे ही वाचा 

शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्याकडून पाचवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, खेड तालुक्यातील खळबळजनक घटना 

ऐकावं ते नवलच! गुलाबी थंडीत गावकऱ्यांना आंघोळीसाठी ‘हे’ गाव देणार मोफत गरम पाणी 

कोल्हापूर : निवडणूक समोर ठेवून विरोधकांचा बिनबुडाचा आरोप – सरपंच सविता कांबळे 

Back to top button