कोल्हापूर : रूई येथील अण्णासाहेब राजमाने विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात

कोल्हापूर : रूई येथील अण्णासाहेब राजमाने विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात

रुई; पुढारी वृत्तसेवा : येथील आण्णासाहेब राजमाने विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते दिलीप करपे व सागर पाटील यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुख्याध्यापक पी.डी.कोरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. कलाम यांची वेशभूषा केलेल्या वरद वडर या विद्यार्थ्याचाही सत्कार करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले. केतकी चव्हाण, समीक्षा जिरगे, सायमा सुतार, प्रिया फास्के, श्रेया कुंभार, अलसफा पट्टणकुडी, तस्मिया जंगले यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर मनोगते व्यक्त केली. यावेळी एस.ए.देसाई यांनी वाचन संस्कृतीचे जीवनातील महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन एस.आर.वर्धन यांनी तर आभार के.एस.ढाले यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news