कोल्हापुरात रंगणार कवितेचा अविस्मरणीय सोहळा; राजर्षी शाहूंना समर्पित 'काव्यांगण' | पुढारी

कोल्हापुरात रंगणार कवितेचा अविस्मरणीय सोहळा; राजर्षी शाहूंना समर्पित 'काव्यांगण'

कोल्हापूर : काव्यांगण कोल्हापूर आयोजित, लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार, कोल्हापूर आणि मुक्तबंध विचारमंच, कागल यांच्या समन्वयाने गुरुवार दि. १३ ऑक्टोबर रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे निमंत्रितांचे राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आयोजित केले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहूंना हे संमेलन समर्पित करण्यात येणार आहे. या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील अनेक नामांकित युवा कवी कोल्हापुरात येत आहेत.

संमेलनासाठी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम कवी अनंत राऊत (अकोला), कवी डॉ. स्वप्नील चौधरी (सोयगाव), रोहित शिंगे (इचलकरंजी), विश्वास पाटील (राधानगरी), रोहिणी कदम (मुंबई), सारंग पांपटवार (नांदेड), अजय त्रिभुवन (औरंगाबाद), शेखर चोरगे (पुणे) या कवींच्या कवितेतून गुरुवारची संध्याकाळ कोल्हापूरकरांसाठी एक अविस्मरणीय काव्यसंध्या ठरणार आहे.

या कवी संमेलनाचे उद्घाटन जितेंद्र उर्फ जितू भैराण्णा पाटील कोल्हापूर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी ॲड. सी.बी. कोरे – रेंदाळकर अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. विशेष उपस्थिती म्हणून महेंद्र ज्वेलर्स चे मेहुल ओसवाल, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, विश्वराज महाडिक, अविनाश जाधव, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील, अंकुश पोळ, संदीप पाटील, चंद्रशेखर कांबळे प्रा.सागर माने, सुनील कांबळे याबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा परिसरातील सर्व काव्यरसिकांनी या कवी संमेलनासाठी हजर राहून या काव्य सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन काव्यांगण, कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. सर्व रसिकांसाठी मोफत प्रवेश राहील.

Back to top button