हातकणंगले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; हातकणंगले- इचलकरंजी वाहतूक ठप्प (Video) | पुढारी

हातकणंगले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; हातकणंगले- इचलकरंजी वाहतूक ठप्प (Video)

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले व परिसराला पहाटेपासूनच परतीचे पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक गावातील मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे. सर्वाधिक रहदारीचा रस्ता असलेल्या इचलकरंजी -हातकणंगले मार्गावरील रेल्वेच्या दोन्ही भुयारी मार्गावर पाणी साचल्यामुळे इचलकरंजी आणि पेठवडगाव, पुणे ,मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. तसेच रुकडी, तारदाळ, माणगाववाडी रेल्वे भुयारी मार्गखालील वाहतूक बंद झाली आहे.

सोयाबीनला जबर फटका 

परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला जबर फटका बसला. पावसाने सोयाबीन भिजल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. आणखीन चार दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा :  

Back to top button