Share Market Today | कमकुवत जागतिक संकेताचा फटका, सेन्सेक्स ८४३ अंकांनी घसरून ५७,१४७ वर बंद | पुढारी

Share Market Today | कमकुवत जागतिक संकेताचा फटका, सेन्सेक्स ८४३ अंकांनी घसरून ५७,१४७ वर बंद

Share Market Today : कमकुवत जागतिक संकेतामुळे आज मंगळवारी (दि.११) सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली. सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स सुमारे १९५ अंकांनी खाली येऊन ५७,७९५ वर होता. तर निफ्टी १७,३०० च्या खाली येऊन खुला झाला होता. त्यानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्सची घसरण वाढली. सेन्सेक्स ८४३ अंकांनी खाली येऊन ५७,१४७ वर बंद झाला. तर निफ्टी २५७ अंकांच्या घसरणीसह १६,९८३ वर बंद झाला. JSW Energy चे शेअर्स ६ टक्क्यांनी तर झोमॅटोचे ५ टक्क्यांनी घसरले. वॉल स्ट्रीटवर रात्रभर लक्षणीय घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई समभागही घसरले. जपानचा निक्केई निर्देशांक २.३४ टक्क्यांनी घसरला. तर दक्षिण कोरियाचा KOSPI २.२२ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १.७२ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.

एनएसई प्लॅटफॉर्मवर आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल्स, ओएनजीसी, डिवीज लॅब आणि टायटन या कंपन्यांचे शेअर्स १.७८ टक्क्यांपर्यंत घसरले. तर विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स आणि हिंदाल्को यांचे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत होते.

काल सोमवारी बीएसई सेन्सेक्स २०० अंकांनी खाली येऊन ५७, ९९१ वर बंद झाला होता. तर निफ्टी ७३ अंकांनी घसरून १७,२४१ वर बंद झाला होता. सोमवारी सकाळच्या सत्रातील सेन्सेक्सच्या (Sensex crash) घसरणीमुळे काही क्षणात गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका बसला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरवाढीनंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

कमकुवत जागतिक संकेताचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहेत. अमेरिकेच्या बेरोजगारीचा दर ३.५ टक्के असून हा कमी झालेला बेरोजगारीचा दर असे दर्शवितो की फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविणे सुरूच ठेवेल. याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. (Share Market Today)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची चिंता गुंतवणुकदारांना वाटत आहे. अमेरिकेच्या बेरोजगारीचा दर ३.५ टक्के असून हा कमी झालेला बेरोजगारीचा दर असे दर्शवितो की फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविणे सुरूच ठेवेल. याचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात ७,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय समभागांची विक्री केली आहे. आता रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,२५१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती. (Share Market Today)

हे ही वाचा :

Back to top button