श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक | पुढारी

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक

नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या दसरा महोत्सव सोहळा पालखी मिरवणूक होणार आहे. यानिमित्त दत्त देवस्थान समितीचीकडून सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

कृष्णा पंचगंगा संगमावर दत्त मंदिरातून पालखी मिरवणूक निघणार आहे. पालखी जाण्याच्या मार्गावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी ऐतिहासिक व धार्मिक पद्धतीने सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी खोचरे बंधूनी सर्व सजावट केली आहे.

दुपारी चार वाजता धुपारती झाल्यानंतर साडेचार वाजता पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल. पालखी जाणे येण्याच्या मार्गावर श्रींच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येईल. तसेच सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडेल. यांनतर पालखी मंदिरात प्रस्थान करेल त्यानंतरच सुवासिनींना आरती करता येईल.

या तीर्थक्षेत्रावरील हा मोठा सोहळा असून लाखों भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी चिटणीस, संजय पुजारी विश्वस्त, कर्मचारी सेवेकरी बंधूं तसेच ब्रह्म वृंद यांनी या सोहळ्याची तयारी केली आहे. उद्या बुधवारी दत्त मंदिरात दिवसभर काकड आरती श्री चरणी महापूजा तसेच शेजारी पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत व चातुर्मासानिमित्त बंद असलेला बंद पालखी सोहळा उद्या बुधवारपासून पूर्ववत सुरू होईल.

हेही वाचा 

कोल्हापूर : पंचगंगा कामगारांचा दसरा गोड : फरकाची रक्कम खात्यावर जमा 

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद; स्फोटाद्वारे खडक फोडण्याचे काम 

काेल्‍हापूर : श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगद्धात्री रूपात पूजा

Back to top button