कोल्हापूर : पंचगंगा कामगारांचा दसरा गोड : फरकाची रक्कम खात्यावर जमा | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा कामगारांचा दसरा गोड : फरकाची रक्कम खात्यावर जमा

कबनूर : पुढारी वृत्तसेवा : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना कामगारांना वेतन वाढीच्या ३३ महिन्यांच्या फरकाचे रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम दस-या पूर्वी दोन दिवस आधि कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याने कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याच्या शेती विभागाने कामगार संघ इंटक अध्यक्ष आझाद शेख व पदाधिकारी यांचा सत्कार केला.

फरकाची रक्कम दोन हप्त्यात देण्यात येईल, असे कारखान्याने चेअरमन पी. एम. पाटील यांनी १५ दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यातील पहिल्या हप्ता म्हणून ५० टक्के  रक्कम  कामगारांना दसरा सणापूर्वी अदा करण्यात आली. उर्वरित ५० टक्के रक्कम सन २०२२-२३ गळीत हंगाम संपल्यानंतर दोन महिन्यांच्या आत देण्यात येणार आहे.

यामुळे कामगारांना फरकाची रक्कम दोन हप्त्यात देणारा पंचगंगा कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. याकामी श्री रेणुका व पंचगंगा साखर कारखाना व्यवस्थापन मंडळ व इंटक अध्यक्ष आझाद शेख तसेच कामगार संघ इंटकचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button