उद्या अतिवृष्टी : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हाय अलर्ट | पुढारी

उद्या अतिवृष्टी : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हाय अलर्ट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.

आपल्या गावात, परिसरात अतिवृष्टी मुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाह्य मदतीची गरज असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्यात पावसाचा जोर कायम असून गुरूवारपर्यंत हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह कोकण व मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम आणि वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे त्याचा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्याटप्प्याने प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.

दापोलीत रात्रभर पावसाचं थैमान!

 दापोलीत (Ratnagiri Rain) रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतील केळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.

हे ही वाचलत का :

SATERI MANDIR | कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदिर

Back to top button