युवा पिढीमध्ये देश-धर्माविषयी आस्था, प्रेम हवे : जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी | पुढारी

युवा पिढीमध्ये देश-धर्माविषयी आस्था, प्रेम हवे : जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी

किणी (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : समाजाची प्रगती साधायची असेल तर आजच्या युवा पिढीला देश आणि धर्माविषयी आस्था, प्रेम, भक्ती असली पाहिजे यासाठी पालकांनी त्यांच्यावर सुसंस्कार करणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन जगतगुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी किणी येथे बोलताना केले.

कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ बेळगाव मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे पट्टाभिषेक महोत्सवानंतर प्रथमच किणी येथे आगमन झाले. त्यानिमित्त किणी येथील जैन समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून हजारो श्रावक श्रविकांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडली. यावेणी विविध ठिकाणी महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर श्री पार्श्वनाथ जैन मंदिरात झालेल्या मुख्य कार्यक्रमात महाराजांची पाद्यपूजा कुमार जिनगोंडा पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली. जय जिनेंद्र महिला मंडळाच्यावतीने शास्त्रदान तर अमोल चौगुले यांचे वतीने वस्त्रदान तसेच पाटील ग्रुपच्या वतीने जपमाळ प्रदान करण्यात आली.१०५ आर्यिका सक्षममती माताजी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.वीर महिला मंडळाच्या महिलांनी स्वागत केले, प्रा.आप्पासाहेब भगाटे यांनी प्रास्ताविक व महाराजांची ओळख करून दिली.सुप्रिया पाटील यांनी मंगलाचरण केले, सूत्रसंचलन सुरेखा दणाने यांनी केले तर आभार अमृता पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील – किणीकर, ॲड.एन.आर.पाटील, बाळासाहेब पाटील, राजगोंड पाटील, राजेंद्र पाटील, वृषभ पाटील, अभय पाटील, नितीन पाटील, रोहित दणाने यांचेसह श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button