कोल्हापूर : रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझेकंबरडे मोडले, विसर्जन मिरवणुकीत प्रिन्स क्लबचा उपासनात्मक देखावा | पुढारी

कोल्हापूर : रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझेकंबरडे मोडले, विसर्जन मिरवणुकीत प्रिन्स क्लबचा उपासनात्मक देखावा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मंगळवार पेठ खासबाग परिसरातील प्रिन्स क्लबच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा साजरा करण्यात येत आहे. मंडळाचा जावळाचा गणपती म्हणून श्रद्धास्थान असणारा बाळ गणपतीची मूर्ती दान करून छोट्या शाडोच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

युवक आणि युवतींनी कोणत्याही वाद्या शिवाय घंटा आणि टाळ्यांचा नाद करीत ही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. या वेळी ध्वनी प्रदूषण नको, पाणी प्रदूषण नको, असे फलक घेऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये लहान बालकांनी गणपती आणि उंदिरमामाचा वेष परिधान केला आहे. उंदीर मामांच्या सोबत गणपती बाप्पांचे कपड्यांची गाठोडे आणि हाता पायाला बॅडेस आणि हाताला प्लास्टर अशा अवस्थेत गणपती बाप्पा चालत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझेकंबरडे मोडले

महापालिकेचे आभार रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझे कंबरडे मोडले असे भाष्य गणपती बाप्पा करीत आहेत. अशी लक्षवेधी फलक मिरवणुकीमध्ये चर्चेचा विषय होते.

हेही वाचलंत का?

Back to top button