कोल्‍हापूर : ‘त्या’ शिक्षकाला 3 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | पुढारी

कोल्‍हापूर : ‘त्या’ शिक्षकाला 3 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

पेठवडगाव : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे स्टेटस मोबाईलवर लावल्या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी अटक केलेल्या अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा शिक्षक जावेद अहमद हजाम (रा. डंगीवजा, ता. बारामुल्‍ला, काश्मीर) याला वडगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. सोनवणे यांनी 3 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, देशद्रोही वृत्तीचा संशयित आरोपी हजाम याचा निषेध नोंदवत वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश तांदळे यांनी त्याचे वकीलपत्र न घेेण्याचा ठराव केला आहे.

पोलिसांनी संशयित हजाम याला न्यायमूर्ती सोनवणे यांच्या समोर हजर केले. तुला जामीन कशासाठी पाहिजे, असा प्रश्‍न न्यायमूर्ती सोनवणे यांनी विचारला. यावर हजाम याने माझी पीएच.डी.ची परीक्षा असल्याचे त्याने इंग्रजीत सांगितले. मात्र न्यायमूर्ती सोनवणे यांनी त्याला 3 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वडगाव बार असोसिएशनने वकीलपत्र न घेण्याच्या निर्णयामुळे संशयित हजाम व त्याचा एक नातेवाईक तणावग्रस्त होते. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर हजाम न्यायालयाबाहेर रडत होता.

Back to top button