कोल्हापूर टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन | पुढारी

कोल्हापूर टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे निधन

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सामाजिक कार्यकर्ते, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांचे मंगळवारी पहाटे राहत्या घरी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सकाळी आठ वाजता मिरजकर तिकटी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या टोल विरोधात जन आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचे निमंत्रक म्हणून टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे साळोखे यांनी सक्रिय योगदान दिले.

तब्बल सहा वर्षाहून अधिक काळ टोल विरोधातील लढा झाला. परिणामी राज्य सरकारला कोल्हापूरचा टोल रद्द करणे भाग पडले.

या लढ्यात साळोखे अग्रणी होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. राजीव गांधी सहकारी सूतगिरणीचेही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.

सात वर्षांपुर्वी निवासराव साळोखे यांना धमकीचा फोन

मागच्या सात वर्षांपुर्वी निवास साळोखे यांना निनावी नावाने फोन आला. समोरील व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होती. त्याने निवास साळोखे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. निवास साळोखे यांनी त्या व्यक्तीला तुम्ही कोण बोलताय? तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? असे विचारले. यावरही त्याने शिवीगाळ करणे सुरू ठेवले. तसेच निवास साळोखे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर निवास साळोखे यांनी फोन ठेवला. दरम्यान काही काळाने पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला. यावेळी त्यांच्या मुलाने फोन घेतला. यावेळीही ती व्यक्ती त्याच भाषेत बोलत होती. फोन ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयवंत मोहिते यांना फोनवरून संपर्क केला होता .

Back to top button