कोल्हापूर : मनोरुग्णाने फोडले बुलेटचे शोरूम; चार बुलेटवरून केली सवारी | पुढारी

कोल्हापूर : मनोरुग्णाने फोडले बुलेटचे शोरूम; चार बुलेटवरून केली सवारी

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : येथील कोल्हापूर रस्त्यावरील बुलेट वाहनाच्या शोरुमचे कुलूप तोडून मनोरुग्णाने बुलेट लांबवली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी संशयित मनोरुग्ण अनिलकुमार सचिदानंद राम (सध्या रा. डॉ.आंबेडकरनगर. मूळ रा. पटणा बिहार) यास बुलेटसह ताब्यात घेतले आहे. त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलो आहे.

कोल्हापूर रोडवर प्रतिक प्लाझाच्या बेसमेंटमध्ये बुलेट गाड्याचे शोरुम आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या शोरुमचे कुलूप तोडून अनिलकुमार याने ट्रायलसाठी ठेवलेल्या 4 बुलेट बाहेर काढल्या. त्यातील दोन गाड्यावरून त्याने फेरफटकाही मारला. त्यानंतर एक बुलेट घेऊन त्याने डॉ.आंबेडकरनगर परिसरातील आपली खोली गाठली. गाड्यांचे शोरुम फोडण्यात आल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे डॉ.आंबेडरनगरमधून बुलेटसह अनिलकुमार राम याला ताब्यात घेतले. चौकशीत तो मनोरुग्ण असल्याचे उघडकीस आले. त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांनी त्याला मिरजेतील मनोरुग्णालयात पाठवले आहे.

हेही वाचा

Back to top button