नारायणगाव: सराफ व्यावसायिकाचे दागीेने लांबवणारे दोघे जेरबंद | पुढारी

नारायणगाव: सराफ व्यावसायिकाचे दागीेने लांबवणारे दोघे जेरबंद

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव येथील सराफ व्यवसायिकाचे ३० तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या दोन कारागिरांना नारायणगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल व छत्तीसगडमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. सुखदेव सिंग आणि जयदेव दास मूळ (रा. पश्चिम बंगाल) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेला इसमांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद नारायण बिरा सुळे (वय ३९, धंदा- सोनार, रा. शिंदे मार्केट नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे सुखदेव व जयदेव हे सोने कारागीर म्हणुन काम करीत होते. १० ऑगस्ट रोजी फिर्यादी यांचे ३० तोळे वजनाचे सोने चोरी करून नेले. फिर्यादी यांनी कारागिरांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता फोन स्वीच ऑफ होता. ते ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी कुलूप होते. त्यामुळे फिर्यादीच्या या तक्रारीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासकामी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या परवानगीने व सुचनेनुसार तात्काळ स.पो.नि. ताटे यांनी नारायणगावचे तपास पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस नाईक धनंजय पालवे, पो. काॅ. सचिन कोबल यांना तात्काळ पश्चिम बंगाल येथे रवाना केले.

या पथकाने सापळा लावुन घाटाल (पश्चिम बंगाल) येथुन आरोपी सुखदेव सिंग यास ताब्यात घेतले व रायपुर, छत्तीसगड येथुन दुसरा आरोपी जयदेव दास यास वेशांतर करून शिताफीने ताब्यात घेतले. या पथकाने सदर गुन्हयातील सर्व मुददेमाल (३० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने) यशस्वीरित्या परत मिळवला आहे. ही कामगीरी ही पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. पृथ्वीराज ताटे, पो.स.ई. धुर्वे, पो.ना. धनंजय पालवे, पो.काॅं. सचिन कोबल यांनी केली.

Back to top button