House of the Dragon Premier : भारतीय कलाकरांकडून ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चे कौतुक | पुढारी

House of the Dragon Premier : भारतीय कलाकरांकडून ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चे कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी व बहुचर्चित एबीओची ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ (House of the Dragon Premier) ही वेब सिरीज जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘फायर ॲन्ड ब्लड’ या पुस्तकारवर आधारित आहे. ज्यामध्ये हाऊस ऑफ टार्गेरियनचा इतिहास दाखविण्यात आला आहे. जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या वेब सिरिजच्या कथानकाच्या आधीच्या २०० वर्षापुर्वीच्या घटनांवर ही कथा आधारित आहे. १० भागांची वेब सिरीजचे २२ ऑगस्टपासून डिज्झने प्लस हॉटस्टारवर दर सोमवारी स्ट्रीमिंग केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर या मालिकेचा प्रीमिअर शो मुबंई येथे आयोजित करण्यात आला होता. हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी या मालिकेतील पात्रांचे मोठ्या पडद्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले. याचा प्रीमियर शो पाहून सर्वच कलाकर यावेळी थक्क झाले होते. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ कसे असेल याचा अंदाज येतो.

“हाऊस ऑफ द ड्रॅगन” (House of the Dragon Premier) या वेब सिरीजमध्ये व्हिसेरीसचा भाऊ डॅमन टारर्गेरिनची भूमिका करणारा अभिनेता मॅट स्मिथचे काम अभिनेता जिम सर्भ याला खूपच प्रभावी आणि मनोरंजक वाटला. यासह एमा डी आर्सिने साकारलेली राजकुमारी रेनेरा टारगारेनची भूमिका देखील अनेकांना खूप आवडली. अनेकांना अशी भूमिका करायची होती. कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेता अभिषेक बॅनर्जी म्हणतो, “मला प्रिन्सेस रेनेरा टारगारेनची व्यक्तिरेखा खूप आवडली. मी अंदाज लावू शकतो की ती मालिकेत खूप काही करेल आणि जेव्हा एक स्त्री शक्तिशाली पुरुषांमध्ये नेता बनते तेव्हा बर्‍याच गोष्टी घडतात ज्यावर विश्वास बसत नाही.’

House of the Dragon Premier

तसे पहायला गेले तर ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ची (House of the Dragon Premier) सर्व पात्रे एकापेक्षा एक सरस आहेत. पण राजकुमारी रेनेराचे पात्र बहुतेकांना आवडले. प्राजक्ता कोळीच्या मते, ती ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ या बलाढ्य ड्रॅगनची चाहती आहे. प्रिन्सेस रेनेरा टार्गेरिनच्या व्यक्तिरेखेनेही ती प्रभावित झाली होती.

House of the Dragon Premier

इतकंच नाही तर ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ या मालिकेतील राजकुमारी प्लबिता बोरठाकूरलाही राजकुमारी रेनेरा टार्गेरिनची भूमिका खूपच प्रभावी वाटली. “त्याच्यामध्ये खूप खात्री आणि आत्मविश्वास आहे,” ती म्हणते. कधीकधी ती खूप स्पष्ट दिसते आणि कधीकधी खूप गोंधळात टाकणारी. अशी भूमिका करण्याची संधी मिळाली तर मला ती करायला नक्कीच आवडेल.

‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ या सिरिजच्या प्रीमियर शो जिम सर्भ, रोहित सराफ, प्राजक्ता कोळी, प्लाबिता बोरठाकूर, आहाना कुमरा, रोहन जोशी, अभिषेक बॅनर्जी, वरुण ठाकूर, रोहन जोशी, यशस्विनी दायमा, समारा स्टार्स, तिजोरी, अत्युल आदी कलाकारांनी पाहिला. हे सर्व कलाकार हा प्रीमियर पाहून खूपच भारवलेले पाहण्यास मिळाले.

Back to top button