'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा'च्या व्हाईस चेअरमनपदी ॲड. विवेक घाटगे | पुढारी

'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा'च्या व्हाईस चेअरमनपदी ॲड. विवेक घाटगे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : १५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या मीटिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व विद्यमान बार कौन्सिल मेंबर ॲड. व्ही एन घाटगे यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापनेचे अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी या पदाचा वापर केला जाईल, अशी माहिती ॲड. घाटगे यांनी दिली.

यावेळी ॲड. घाटगे म्हणाले की, खंडपीठ कृती समिती व वकिलांच्या जोरावर ही निवड झाली असून, व्हाईस चेअरमनपद मी समस्त वकिलांना समर्पित करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, यासाठीच या पदाचा वापर केला जाईल, याची हमी देतो. बार कौन्सिल या शिखर संस्थेमध्ये कोल्हापूरमधून आज अखेर प्रथमच व्हाईस चेअरमनपदाची निवड झालेली आहे.

या निवडीमुळे सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीची ताकद वाढली असून त्याचा सदुपयोग केला जाईल. जोपर्यंत खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत कोणताही सत्कार मी स्वीकारणार नाही व त्यास आपण पाठिंबा द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button