कोल्हापूर : घरगुती वादातून पतीने वरवंटा डोक्यात घालून केला पत्नीचा खून; पन्हाळा तालुक्यातील दरेवाडीतील घटना | पुढारी

कोल्हापूर : घरगुती वादातून पतीने वरवंटा डोक्यात घालून केला पत्नीचा खून; पन्हाळा तालुक्यातील दरेवाडीतील घटना

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्ले येथे घरगुती कारणावरून पतीनेच पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अनिता बाबासो जाधव (वय ४६) असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी बाबासो बळवंत जाधव (वय ४९) याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासो जाधव याला दारूचे व्यसन होते. तो काही काम धंधा करत नसल्याने त्याचे घरात नेहमी पत्नी अनिता व मुलाबरोबर वाद होत होते. सोमवारी रात्री त्यांच्यातील वाद विकोपला गेला. यामध्ये बाबासो याने अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. यामध्ये अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद तेजस बाबासो जाधव याने पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी बाबासो ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैशाली राजपाल करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button