अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार : किरीट सोमय्या

Kirit Somaiya
Kirit Somaiya

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे ट्वीट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि.१६) सकाळी केले. रिसॉर्टच्या बांधकामप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे आहे. परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news