फासेपारधी
फासेपारधी

ठाकरेंसोबत जिव्हाळा कायम राहणार; शिंदे गटातील खासदार धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आदित्य ठाकरे माझे मित्र आहेत. ठाकरे कुटुंबासोबत जिव्हाळा आहे. राजकीय दुरावा झाला म्हणजे त्यांच्यापासून वेगळे झालो नाही. अशा भावना खासदार धैर्यशील माने यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते भावूक झाले होते.

ठाकरे कुटुंबाने मोठं केलं त्या कुटुंबाला सोडताना त्रास होतो. मोठं होण्यासाठी ज्या कुटुंबाने आधार दिला त्या कुटुंबासोबत राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय दुरावा कमी व्हावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता कायम राहील. आदित्य ठाकरे यांनी कामे दिली, वेळ दिला पण माझ्या मतदारसंघातील सुचवलेल्या कामांपैकी फक्त एकच काम मार्गी लागले. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली, पण तेव्हा भाजप शिवसेना एकत्र होती. शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसेनेतील खदखद निदर्शनास आली होती. त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी एक वाट निर्माण केली. असे खासदार माने यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news