हातकणंगले पोलिस ठाण्याकडून चंदन तस्करी करणारी टोळी जेरबंद | पुढारी

हातकणंगले पोलिस ठाण्याकडून चंदन तस्करी करणारी टोळी जेरबंद

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : हातकणंगले पोलिस ठाण्याकडून चंदन तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. हातकणंगले पोलिस पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद रित्या थांबलेल्या गाडीची चौकशी करण्यासाठी गेले असता पोलिसांच्या लक्षात येताच आंतरराज्य चंदन तस्करी करणाऱ्या टोळीस जेरबंद केले आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

हातकणंगले तालुक्यातील चोकाक जवळ पेट्रोलिंग दरम्यान विशाल मंगल कार्यालयासमोर चोकाक येथे संशयास्पद एक चार चाकी वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर गाडीमध्ये चंदन चोरी व दरोडा घालण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले.

सदर घटनास्थळी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांनी चकवा देत पळू लागले सदर आरोपींचा १.५ की.मी.पाठलाग करून मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अनेक चोऱ्यांचा उलगडा

दरम्यान चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना हातकणंगले पोलिस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली.

यामध्ये आरोपींनी, आजरा, चिकोडी, गडहिंग्लज तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी चंदन झाडांची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्याचे समोर आले.

त्याचप्रमाणे यातील सर्व आरोपींनी घरफोडी व विविध प्रकारच्या चोर्‍या केलेल्या आहेत.

आरोपींवर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात घरफोडीचे दोन चिकोडी येथे यमनगंडी पोलिस ठाणेस घरफोडीसारखे विविध गुन्हे दाखल आहे.

त्याचप्रमाणे अटक आरोपींवर चिकोडी येथील न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट काढले असून ते अद्यापही सापडले नव्हते.

पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह सदर कारवाई करता रात्र गस्ती करता पो. कॉ. संग्राम पाटील,पो. कॉ. अतुल निकम, पो. कॉ. सुहास गायकवाड, पो. कॉ. संग्राम खराडे, पो. कॉ. पांडुरंग जाधवर, अधिक तपास करत आहेत.

Back to top button