मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरात | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे कोल्हापूर येथील निवासस्थानी रविवारी निधन झाले. पाटील यांच्या सांत्वनाकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथ सोहळ्याला दिल्ली येथे उपस्थित आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने नवी दिल्ली येथून ते आज कोल्हापूमध्ये येणार आहेत. दुपारी २ वाजता मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. ४ वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर ते आमदार पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button