पन्हाळगडावर पोलिसांचा हुल्लडबाजांना दणका : तीस हजार रुपये दंड वसूल | पुढारी

पन्हाळगडावर पोलिसांचा हुल्लडबाजांना दणका : तीस हजार रुपये दंड वसूल

पन्हाळा;पुढारी वृत्तसेवा: पन्हाळगडावर आज तीस हुल्लडबाजी करणाऱ्या युवक-युवतींवर पन्हाळा पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची, माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.

पन्हाळा येथे पर्यटनाबाबत 144 कलम लागू आहे. यादरम्यान गडावर ओरडत गाड्या चालवणे, वाहन परवाना नसताना गाड्या चालवणे, दंगा करणे, गाडीला नंबर-प्लेट नसणे याप्रकरणी तीस जणांवर पन्हाळा पोलिसांनी आज कारवाई केली. पन्हाळा पोलीसांनी प्रवासी कर नाक्यापासून कारवाईला सुरवात केली आहे.

स्‍थानिकांना नाहक त्रास

सेल्फी काढतानाच सेल्फी पाँईंटवरच अनेकजण पोलिसांच्या तावडीत सापडले. पन्हाळा गडावर जाताना हे युवक मोठमोठ्याने गावातून ओरडत जात होते. याचा येथील नागरिकांना नाहक त्रास होत होता. ओरडत फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पन्हाळगडावर  हुल्लडबाजी केल्‍यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले. आजच्या या कारवाईत बाजीराव चौगले, काँ.जाधवर यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा :

Back to top button