

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. शहरातील महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयासह ताराबाई पार्कातील निवडणूक कार्यालयात याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवरही याद्या पाहता येणार आहेत.
31 प्रभागासाठी 4 लाख 61 हजार 892 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 2 लाख 32 हजार 057 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 29 हजार 817 इतकी आहे. इतर मतदारांची संख्या 18 आहे. सर्वाधिक मतदार प्रभाग क्र. 11 मध्ये तब्बल 19424 मतदार आहेत. प्रभाग क्र. 31 मध्ये सर्वात कमी 10505 मतदारांची संख्या आहे. प्रभाग क्र. 11 मध्ये सर्वाधिक पुरुष मतदार 9820 व सर्वाधिक महिला मतदार 9604 आहेत. प्रभाग क्र. 31 मध्ये सर्वात कमी पुरुष मतदार 5430 आणि महिला मतदार 5074 आहेत.
विभागीय कार्यालयानुसार मतदार याद्या अशा – गांधी मैदान विभागीय कार्यालय (क्र. 1) 21, 22, 26, 27, 28, 29, 31, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 2) 9, 10, 11, 12, 20, 23, 24, 25, राजारामपुरी विभागीय कार्यालय (क्र. 3), 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 30, छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 4) 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.