व्हिडिओ : चांदोलीच्या रस्त्यावर कोल्हयांचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शित्तूर-वारूण : पुढारी वृत्तसेवा : शेडगेवाडी-चांदोली मुख्य मार्गावरील काळुंद्रे ते पणुंब्रे दरम्यान कोल्ह्याचे दर्शन होत आहे. उसाच्या शेतातून बाहेर येऊन दोन ते चार कोल्हयांचा हा कळप मुख्य रस्त्यावरुन इकडून तिकडे पळत आहे. बऱ्याचदा हे कोल्हे रस्त्यावरच ठाण मांडून उभे राहत आहेत. हे कोल्हे अचानक रस्त्यावर आडवे येत असल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तर शेतामध्ये जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या या परिसरातील शिवारांमध्ये रानकुञ्यांचेही कळप शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडत आहेत. पर्यटक व प्रवाशी आपली वाहने थांबवून कोल्हयांचा रस्त्यावरील हा मुक्तसंचार पाहत आहेत. वन्यप्राण्यांच्या अशा मुक्तसंचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गतवर्षी या परिसरातील शित्तुर-वारूण या गावातील संतोष पाटील, कार्तिक पाटील व संभाजी पाटील या युवकांवर कोल्ह्यांनी हल्ला चढवला होता. वनविभागाने या वन्यप्राण्यांना पकडून तत्काळ त्यांच्या मूळ अधिवासात अभयारण्यामध्ये सोडावे, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.
हेही वाचलंत का ?
- ICC Test Ranking : विराट कोहलीला सर्वात मोठा धक्का! 2053 दिवसांनी ‘अशी’ घडली घटना…
- NH-4 Highway: पुणे-सातारा महामार्गावरील बोगद्याचे काम प्रगतीपथावर; मंत्री नितीन गडकरींची माहिती
- १८ दिवसांमध्ये ८ तांत्रिक बिघाडाच्या घटना : ‘स्पाईसजेट’ला ‘डीजीसीए’ची नोटीस!