panhala accident : मसाई पठारावरील दरीत कार कोसळली; एकजण ठार | पुढारी

panhala accident : मसाई पठारावरील दरीत कार कोसळली; एकजण ठार

पन्हाळा , पुढारी वृतसेवा: पन्हाळ्याजवळील मसाई पठाराच्या उत्तरेला वेखंडवाडीजवळ कार दरीत (panhala accident )कोसळून एकजण ठार झाला तर दोघे जखमी झाले. वेखंडवाडी येथील साळवणदरा या परिसरात मोठ्या कडयावरून मारुती स्विफ्ट कार दरीत कोसळून हा अपघात (panhala accident) झाला.

या अपघातात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि प्रत्यक्षदर्शींकडून समजलेली अधिक माहिती अशी,

इचलकरंजी येथील निखिल युवराज शिंगे (रा. कबनूर) अमित गुप्ता व पुष्पम लिगाडे हे वर्षापर्यटनासाठी मसाई पठारावर आले होते.

पावसात भिजत आनंद घेत ते सायंकाळी पठारावर फिरत होते. त्यांना पठारावरील कड्याचा अंदाज आला नाही.

त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ( एमएच-१२ जेएम – ३९५६) कड्यावरून वेखंडवाडीच्या दिशेने सुमारे पाचशे ते सहाशे फूट खोल दरीत कोसळली.

यात पुष्पम लिगाडे हा युवक जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजन गंभीर जखमी झाले आहेत.

वेखंडवाडी येथील ग्रामस्थांनी या तिघांनाही स्ट्रेचरच्या सहाय्याने दाट जंगलातून व दरीतून रस्त्यावर आणले.

१०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए. पी. काशिद घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

Back to top button