‘राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व’ : राधानगरी धरणावर जलकुंभाचे पूजन | पुढारी

'राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व' : राधानगरी धरणावर जलकुंभाचे पूजन

राधानगरी : पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त मुंबई येथे राजर्षी शाहूंच्या स्मृतिस्तंभाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या स्मृतिस्तंभावर जलाभिषेक करण्यासाठी शाहूंनी दूरदृष्टीने बांधलेल्या राधानगरी धरणातील जल कोल्हापूरातील कृती समितीकडे सुपूर्द करण्यात आले. स्थानिक जलकुंभ अर्पण समितीच्या वतीने धरणस्थळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज (दि.३०) सकाळी करण्यात आले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करून आमदार प्रकाश आबिटकर व स्थानिक समितीकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर भव्य शोभायात्रा काढून जलकुंभ कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला.

जलकुंभाची फुलांनी सजविलेल्या विशेष रथातून राधानगरी धरणस्थळापासून बसस्थानकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीसाठी सर्व शाळेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी, महिला बचत गट, भजनी मंडळे, तरुण मंडळांनी लेझीम पथके, नाशिक ढोल, चित्ररथ, झांजपथक, मर्दानी खेळ, धनगरी खेळ, थोर समाजसुधारक व्यक्तींच्या वेशभूषा सादर केले.

यावेळी श्रीमंत शाहू महाराज, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, प्रा.किसन चौगले, हिंदुराव चौगले, सुशील पाटील कौलवकर, शिवसेना तालुकप्रमुख उत्तम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, ऋतुराज इंगळे, रविश पाटील, रमेश पाटील-बचाटे, तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच भाग्यश्री पाटील, सुहास निंबाळकर, प्रा.पी.एस.पाटील यांच्यासह शाहुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button