‘मातोश्री’ परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला

‘मातोश्री’ परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला
Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री'च्या परिसरात हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे समजते आहे. या घटनेबाबत पोलिसात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

एका टीव्ही वाहिना प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज म्हणाले की, एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडून घरी परतत असताना 'मातोश्री' परिसरातून माझी गाडी जात होती. दरम्यान, कमला नगर जंक़्शन येथे गाडी आली असता तिथे उपस्थित असलेल्या शेकडो शिवसैनिकांनी माझी गाडी पाहताच हल्ला केला. सुदैवाने यात आम्हाला काही दुखापत झाली नाही. हल्ला करणा-यांवर कारवाई व्हावी. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसल्याचे हे चित्र आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्यावर पलटवार केला आहे. कंबोज हे मातोश्री बाहेर रेखी करत असल्याचे म्हटले आहे.

मुंबईत शनिवारी हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असून, त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी 'मातोश्री'समोरच ठाण मांडले आहे. मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत.

राणा दाम्पत्याला धडा शिकवण्यासाठी 'मातोश्री'बाहेर शिवसैनिक ठाण मांडून बसले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी आली. शिवसैनिकांना पाहून उद्धव यांनी ती अलीकडेच थांबवली. गाडीतून उतरत ते शिवसैनिकांना सामोरे गेले. हात जोडून आपल्या शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले. मात्र, 'मातोश्री'समोरून जाण्याचे आवाहन त्यांनी केले नाही. शिवसैनिकांच्या आंदोलनाला पक्षप्रमुखांनीच एकप्रकारे आशीर्वाद दिल्याने शनिवारी ठरल्याप्रमाणे 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न राणा दाम्पत्याने केला, तर अनर्थ घडू शकतो. याचा अंदाज मुंबई पोलिसांना आला असून, खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या खारमधील घरी जाऊन नोटीस बजावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news