भोंगा, हनुमान चालीसानंतर आता राज ठाकरेंकडून ‘महाआरती’चा कार्यक्रम

भोंगा, हनुमान चालीसानंतर आता राज ठाकरेंकडून ‘महाआरती’चा कार्यक्रम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापविले आहे. त्यांनी भोंग्याबाबत राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. त्याचबरोबर ५ जूनरोजी अयोध्या दौऱ्याचीही घोषणाही केली आहे. भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीएफआय संघटनेने राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) शिवतीर्थ येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अयोध्या दौरा, भोंगा वाद, राज ठाकरेंची सुरक्षा, अक्षय्य तृतीयेला महाआरती, 'जय श्रीराम' चा नारा, या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.

छेड़ोगे तो छोडेंगे नही, असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा पीएफआय संघटनेने मनसेला दिला आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी पत्र लिहिले आहे. तसेच केंद्र सरकारही राज ठाकरे यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी १० ते १२ रेल्वे आरक्षित करण्यात येणार असून विशेष रेल्वेसाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिले आहे. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. त्याचबरोबर भोंग्याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले असल्याचे नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने मनसेविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. भोंग्यांच्या प्रश्नावर आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आयबी आणि रॉ यांच्याशीही चर्चा सुरू आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news