‘कोल्हापूर उत्तर’मध्ये महाविकास आघाडीचाच विजय : जयंत पाटील | पुढारी

'कोल्हापूर उत्तर'मध्ये महाविकास आघाडीचाच विजय : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री आणि जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध केला आहे. त्यांनी भोंग्यांना विरोध करण्यासाठी हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जंयत पाटील यांनी, राज्यात जाणीवपूर्वक जातीव तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

महागाईची चर्चा होत नाही. पण सध्या हनुमानाची चर्चा केली जात आहे. जाणीवपूर्वक देवांना वापरण्याचे काम सुरु आहे. राज ठाकरे यांच्यानंतर ओवेसी पुढे येतील, असेही जयंत पाटील म्हणाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या पाश्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध होणार होती. पण ही निवडणूक भाजपनं लादली. कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे गेलो. यामुळे लोक आमच्या बाजूने कौल देतील. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महिला आमदार कधीही झालेले नाही. आज एक महिला आमदार येथून विधानसभेत जाईल, अशी आशा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात सुरु असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button