अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी जनआंदोलन छेडणार: उल्हास पाटील

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी जनआंदोलन छेडणार: उल्हास पाटील
Published on
Updated on

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये आणि महापूराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले.

कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी लवकरच परवानगी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसणार आहे.

अधिक वाचा 

कुरुंदवाड येथील पुर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता 'दैनिक पुढारी'शी ते बोलत होते. यावेळी शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे, कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, दत्ता कामत, श्रीमती वैशाली जुगळे आदी उपस्थित होते.

उल्हास पाटील यावेळी म्हणाले की, महापुराचा धोका ओळखून नागरिकांनी स्वतःहून प्रापंचिक साहित्य, जनावरे व कुटुंबासह स्थलांतर केले होते. त्यामुळे प्रशासनावर कोणताही अधिक ताण पडलेला नाही.

अधिक वाचा 

शिरोळमधील १०० टक्के गावे पूरग्रस्त जाहीर करा

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडसह २४ गावांना महापुराचा विळखा पडून बेटाचे स्वरूप आले होते. यामुळे ही गावे १०० टक्के पूरग्रस्त जाहीर करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिला आहे.

अधिक वाचा 

भैरववाडी, गोठणपूर, कुंभार गल्ली, शिकलगार वाडा, मोमीन गल्ली, दत्त मंदिर चिलखी विभाग आदी पूरग्रस्त भागाची उल्हास पाटील यांनी पाहणी केली. यावेळी अशोक सावगावे, दिलीप येवले, प्रा. सुनील चव्हाण, बापूसाहेब जोंग, बाबासाहेब गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news