कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : राज्यपाल

कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : राज्यपाल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील सर्किट बेंच मागणीचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि सहा जिल्ह्यांकरिता कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षकारांना लवकर न्याय मिळेल. तसेच सर्व उद्योग, व्यापार दळणवळण, औद्योगिक, पर्यटन, विमानसेवा क्षेत्राला चालना मिळेल. सर्किट बेंच स्थापन करण्यास राज्यपाल या नात्याने जे काही सहकार्य लागेल, ते करण्यास मी तयार आहे, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि.५) शिष्टमंडळाला दिले.

राज्यपाल कोश्यारी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी सर्किट हाऊस येथे खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व सचिव ॲड. विजयकुमार ताटे- देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी ते बोलत होते.

खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके म्हणाले की, कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर , कोल्हापूर येथे सर्किट बेंचची मागणी गेली ३५ वर्षे प्रलंबित आहे. सहा जिल्ह्यांतील सर्व सामान्य जनतेला, पक्षकार यांना न्याय मागणीकरीता मुंबई येथे जाणे – येणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. पक्षकारांना जलद व कमी खर्चात न्याय मिळणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यांकरीता खंडपीठ स्थापन झाल्यास कोल्हापूर परिक्षेत्राचा विकास होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र लिहून कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करावे, अशी विनंती केली आहे. अशा परिस्थितीत आपण राज्यपाल या नात्याने सर्किट बेंच स्थापनकरीता प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. यावेळी महिला प्रतिनिधी ॲड. तृप्ती नलवडे, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण , ॲड. संदीप चौगुले, ॲड. संकेत सावर्डेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news