कोल्हापूर : कसबा बीड येथे सापडले त्रिस्तरीय वीरगळ ; प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीच्या ठेव्यात भर | पुढारी

कोल्हापूर : कसबा बीड येथे सापडले त्रिस्तरीय वीरगळ ; प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीच्या ठेव्यात भर

कसबा बीड : प्रकाश पाटील
भोजराजाची राजधानी व इ.स.12 व्या शतकातील हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा अद्वितीय नमुना असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील बीडेश्‍वर मंदिर परिसरात त्रिस्तरीय वीरगळ सापडल्या आहेत. त्यामुळे येथील प्राचीन व ऐतिहासिक समृद्धीच्या ठेव्यात मोठी भर पडली आहे.

येथील मंदिर परिसरात राहत असलेल्या नामदेव जाधव, आनंदराव तिवले व बाळासो मोघे यांना किरकोळ काम व नळपाणी पुरवठ्यासाठी खोदाई करताना वीरगळ सापडल्या आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच सापडलेल्या त्रिस्तरीय वीरगळांवर युद्ध, स्वर्गारोहन, विष्णू पूजा आणि बिचवा तलवारी आदी प्रसंग, साधने व भव्य कोरीव कामात सुस्पष्ट शिल्पांकन दिसून येत आहे.

प्राचीन वारसाहक्‍काचे कसबा बीड गाव

प्राचीन व ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असलेल्या येथील बीडेश्‍वर मंदिर परिसरातील शेतशिवार, जलसाठे व गाववस्तीत वर्षानुवर्षे अशा वीरगळ सापडत आहेत. विशेष म्हणजे वीरगळांवरील विलोभनीय कोरीव नक्षीकाम, पुरातन साधने, साहित्य, घटना, प्रसंग शिवाय महान स्त्री-पुरुष, देवदेवतांचे भव्यदिव्य रेखाटन केले आहे. आजपर्यंत दोनशेपेक्षा अधिक वीरगळांशिवाय अनेक ग्रामस्थांना सुवर्णमुद्राही (बेडा) सापडल्या आहेत. यंगबि—गेड व ग्रामस्थांच्या सहकार्याने वीरगळांचा मंदिर परिसरात संग्रह केला असून, अशा वारसाहक्‍काचे संवर्धन व संशोधन काळाची गरज आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button