पन्हाळा किल्ला रस्ता : ‘पुरातत्व’ची परवानगी मिळाल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू | पुढारी

पन्हाळा किल्ला रस्ता : ‘पुरातत्व’ची परवानगी मिळाल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा किल्ला रस्ता : पन्हाळा किल्ल्याच्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती पुरातत्व विभागाची परवानगी मिळाल्यास तातडीने सुरू करणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळोखे यांनी दिली.

साळोखे यांनी आज (दि. २७) तुटलेल्या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.

मुख्य अभियंता साळोखे म्हणाले की, या रस्त्याच्या भक्कम बांधणीसाठी प्रथम तज्ज्ञांमार्फत अभ्यास केला जाईल. त्यानंतरच हा रस्ता बांधला जाईल. यासाठी चार-पाच महिन्याचा कालावधी लागू शकतो. मात्र तोपर्यंत पाऊस थांबला तर या रस्त्याची एकेरी वाहतूक आढवड्याभरात सुरू करू, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा :

पन्हाळगडावरील चार दरवाजा येथील मुख्य रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. पन्हाळगडावर येण्यासाठी असलेला मुख्य रस्ता तुटल्यामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे.

आज सकाळी पन्हाळा येथील रस्त्याच्या पहाणीसाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापनचे मुख्य अभियंता के टी पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर पुणे विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळोखे यांनी देखील भेट दिली.

अधिक वाचा :

मुसळधार पावसामुळे गडावरील पाणी या रस्त्यामध्ये शिरल्यामुळेच या रस्त्याचे भूस्खलन झाले आहे. या रस्त्याचा भराव पाण्यामुळे वाहून गेला आहे. मात्र, या ठिकाणचा खडकाचा बेस कसा आहे. याची तपासणी करून मगच या रस्त्याची पुनर्बांधणी केली जाईल, असे ही मुख्य अभियंता साळोखे सांगितले.

या वेळी कोल्हापूर-सांगली जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता एस एस माने, उप अभियंता सी ए आयरेकर शाखा अभियंताब अमोल कोळी आदी उपस्थित होते.

पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक चेतन भोसले, अकतर मुल्ला यांनी पन्हाळ्याच्या तुटलेल्या रस्त्याविषयी माहिती दिली.

अधिक वाचा :

Back to top button