कोल्हापूर : आई आणि लेकीचे बाहेर अनैतिक संबंध, पण बापाने विरोध केल्याने डोकं फोडून संपवलं ! | पुढारी

कोल्हापूर : आई आणि लेकीचे बाहेर अनैतिक संबंध, पण बापाने विरोध केल्याने डोकं फोडून संपवलं !

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : इचलकरंजीमधील खुनाचा उलघडा झाला आहे. आई व मुलीच्या अनैतिक संबंधांना केलेल्या विरोधाने झालेल्या वादातून शांतिनाथ केटकाळे यांचा पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघींनी मिळून खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. मुलीने लोखंडी गजाने जबर मारहाण करून वडिलांचा निर्घृण खून केला. शांतिनाथ अण्णाप्पा केटकाळे (वय 45, रा. बर्गे मळा) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरीच ही घटना घडली होती.

बर्गे मळा परिसरात शांतिनाथ केटकाळे हे आई, पत्नी सुजाता व तीन मुलींसह राहतात. मंगळवारी त्यांच्या घरात वाद झाला. तेव्हा चिडून मोठ्या मुलीने त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केला. त्यामुळे डोक्याच्या पाठीमागील बाजूचा चेंदामेंदा झाला. केटकाळे यांच्या आईने आरडाओरडा केला. तेव्हा नागरिकांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी संशयित मुलीने आपल्या आईसह घराबाहेर धाव घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. केटकाळे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात व तेथून इंदिरा गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अनैतिक संबंधांना केलेल्या विरोधाने केल्याने खून

आई व मुलीच्या अनैतिक संबंधांना केलेल्या विरोधाने झालेल्या वादातून शांतिनाथ केटकाळे यांचा पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघींनी मिळून खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. सुजाता शांतिनाथ केटकाळे (वय 36) आणि साक्षी शांतिनाथ केटकाळे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 28 फेबजएुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कबनूर येथील शांतिनाथ केटकाळे यांचा लोखंडी कटावणी व बॅट तसेच चाकूने वार करून मंगळवारी रात्री खून करण्यात आला. यानंतर पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाल्या. सुजाता व साक्षी या दोघींचीही चौकशी करण्यात आली. तेव्हा शांतिनाथ यांची पत्नी सुजाता तसेच मुलगी साक्षी या दोघींचेही बाहेर प्रेमसंबंध होते. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होता. मंगळवारी झालेल्या वादातून चिडून या दोघींनी शांतिनाथ यांच्यावर घरातच जोरदार हल्‍ला केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद महावीर कल्‍लाप्पा केटकाळे यांनी दिली.

गुन्ह्यातील वापरलेली हत्यारे जप्‍त करण्यात आली आहेत. अनैतिक संबंधांव्यतिरिक्‍त अन्य कोणत्या कारणातून शांतिनाथ यांचा खून झाला आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. केटकाळे यांच्या अन्य दोन अल्पवयीन मुलींना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

हे ही वाचलं का ?

Back to top button