कोल्हापूर : आ. नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल | पुढारी

कोल्हापूर : आ. नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल

कोल्हापूर; पुढारी वृतसेवा : शिवसेनेचे कार्यकर्ते परब यांच्यावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी राणे यांच्या समर्थकांसह पोलिसांची मोठी गर्दी झाली होती. आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाले आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सायंकाळी साडेचार वाजता वाहनांचा ताफा रुग्णालयात दाखल झाला.

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर आमदार राणे थेट प्राथमिक उपचार केंद्र येथे दाखल झाले. याठिकाणी डॉक्टरांचा मोठा ताफा उपस्थित होता.

हे ही वाचलं का ?

Back to top button