बारा आमदारांच्या निलंबनाला भास्कर जाधव जबाबदार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप | पुढारी

बारा आमदारांच्या निलंबनाला भास्कर जाधव जबाबदार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

बारा आमदारांच्या निलंबनाला भास्कर जाधव जबाबदार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्राला विधानसभेतील बारा आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर देवेद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली आहे. भाजपचं संख्याबळ कमी करण्यासाठी बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने संधी दिली होती मात्र राज्य सरकारला सत्तेचा अहंकार आहे. बारा आमदारांच्या निलंबनाला भास्कर जाधव जबाबदार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी परवागी देण्याच्या निर्णयावरुनही टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायचे आहे का? असा सवाल ही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन घटनाबाह्य ठरवत ते रद्द केले आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. अशा प्रकारचे निलंबन केवळ २०२१ मधील पावसाळी अधिवेशनापुरतेच मर्यादित असू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button