कोल्हापूर : संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ जयंती उत्साहात साजरी | पुढारी

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा

राजमाता जिजाऊ यांची ४२४ वी जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून कोल्हापूरात जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या दरम्यान बिंदू चौक येथील जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. तर प्रतिमेचे पूजन डीवायएसपी प्रिया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरचे डीवायएसपी पाटील यांच्या हस्ते आरोग्य सेवेत स्वतःला वाहून घेणाऱ्या डॉक्टर अनुष्का वाईकर यांना जिजाऊ प्रेरणा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे विनोद कांबळे, सुरेश पाटील, आसिफ कलाईग्नार आणि राम कोळी यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी महापौर हसीना फरास यांच्या हस्ते सामाजिक सेवेत असणाऱ्या विविध मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन वागळे, कार्याध्यक्ष अजय शिंदे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील, जिजाऊ ब्रिगेड विभागीय चारुशीला पाटील, जिल्हा संघटक निलेश सुतार. जिल्हा कार्याध्यक्ष भगवान कोईगडे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनंदा चव्हाण, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अभिजीत भोसले, कल्पना देसाई आणि अभिजीत कांजर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button