सिंधुदुर्गातील तीन तरुण करणार कुडाळ ते कन्याकुमारी सायकल राईड

सिंधुदुर्गातील तीन तरुण करणार कुडाळ ते कन्याकुमारी सायकल राईड
Published on
Updated on

कुडाळ; काशिराम गायकवाड : निरोगी आरोग्याच्या जनजागृतीसाठी कुडाळ येथील रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर हे  कुडाळ ते कन्याकुमारी सायकल राईड करणार आहेत. रोटरी क्लब ऑफ कुडाळ व सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या संस्थांच्या वतीने याचे आयोजन केले आहे. अशी माहिती सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे रुपेश तेली यांनी कुडाळ येथे दिली.

आरोग्याच्या दृष्टीने दररोज थोडावेळ स्वतः साठी काढून सायकलिंग करावे, हा संदेश घेऊन कुडाळचे  सायकलपटू रूपेश, शिवप्रसाद व अमित हे कुडाळ ते कन्याकुमारी असा 1320 किमीचा सायकल प्रवास करणार आहेत. रुपेश याने याआधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 'सायकलिंग सुपर रेन्डोनिअर' हा बहुमान दोनवेळा मिळविला आहे. शिवप्रसाद याचे कपड्यांचे दुकान असून, सायकलिंगमध्ये त्याने सुपर रेन्डोनिअर हा बहुमान पटकावला आहे. तर अमित हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे. या सायकल राईडचा शुभारंभ सोमवारी (दि 18) सायं.4 वाजाता कुडाळ बसस्थानकासमोरून होणार आहे.

चार राज्यांमधून करणार प्रवास 

रुपेश, शिवप्रसाद आणि अमित हे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांतून सायकल प्रवास करणार आहेत. १८ जुलै रोजी कुडाळ येथुन प्रारंभ झाल्यानंतर तिघेजण १३२० किमीचा सायकल प्रवास पूर्ण करणार आहेत. त्यानंतर 25 जुलै रोजी कन्याकुमारी येथून रेल्वेने परतीचा प्रवासास  निघणार असून २६ जुलै रोजी कुडाळ येथे त्यांचे आगमन होणार आहे.

निरोगी आरोग्यासाठी जनजागृती

कुडाळ ते कन्याकुमारी सायकल राईडमध्ये बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, टुमकुरू, सालेम, मदुराई, कन्याकुमारी येथील रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे तिघांना सहकार्य मिळणार आहे. क्लबच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाणार असून, यावेळी सायकलपटू 'सायकलिंग व व्यायामाचे महत्व' याबाबत जनजागृती करणार आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news