पुणे : उतारावर ट्रॅक्टर सुरू झाला अन्…; महिला जखमी; 9 दुचाकींचे नुकसान

पुणे : उतारावर ट्रॅक्टर सुरू झाला अन्…; महिला जखमी; 9 दुचाकींचे नुकसान
Published on
Updated on

पुणे : उतारावर उभा केलेला बंद ट्रॅक्टर अचानक सुटून झालेल्या अपघातात नऊ दुचाकींचे नुकसान झाले असून, एक महिला जखमी झाली आहे. महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि.16) दुपारी बिबवेवाडीतील अप्पर बसडेपो येथील उतारावर घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक रमेश देविदास राठोड (वय 37, रा. येवलेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उतारावर ट्रॅक्टर उभा करून राठोड हा जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक ट्रॅक्टर उतारावरून सुटला. त्याने नऊ दुचाकींना उडवले. त्यामध्ये दुचाकींचे नुकसान झाले आहे. तसेच एका महिलेलादेखील धडक दिली. त्यानंतर तेथील एका झाडाला अडकून तो थांबला. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, चालकाला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news