Firoz Sheikh Fake Baba | फिरोज शेख सापडला; पण हरिश्चंद्र घाडी फरार

Firoz Sheikh Fake Baba |दोघांचेही कारनामे उघड : बडे लोक जात होते भोंदूकडे
Firoz Shaikh Arrested
Firoz Shaikh Arrested
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर भोंदू बाबा फिरोज शेख पोलिसांना सापडला असला, तरी या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी हरिश्चंद्र घाडी हा मात्र फरार झाला आहे. या दोन्ही बाबांच्या कारनाम्यांची जोरदार चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असून, काही बड्या व्यक्ती या दोन्ही बुवा बाबांकडे जात असत, अशी माहिती मिळाली आहे.

Firoz Shaikh Arrested
Firoz Shaikh Arrested | कोलगावातील भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक

फिरोज शेखला तीन दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे येऊन अटक केली आहे. सध्या त्याला ठाणे येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फिरोज शेख हा सावंतवाडीजवळ कोलगाव येथे राहतो. त्याच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांबरोबरच कर्नाटक आणि गोवा राज्यांतील राजकारणात काम करणाऱ्या व्यक्ती येत होत्या. त्याने आपल्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमेचे कार्यकर्ते अनेक वेळा तिथे गेले होते. परंतु, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तो अगोदरच सतर्क होत होता. गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सुद्धा फिरोज शेख याने बेकायदेशीर कृत्य करून जादूटोण्याचे प्रकार केल्याचे म्हटले आहे. फिरोज शेख पूर्वी एका डंपरवर ड्रायव्हर होता. दहा वर्षांपूर्वी त्याने हे कारनामे सुरू केले. त्यानंतर त्याने अनेक खोटे दावे करून पैसे उकळण्याचे काम सुरू केले. यात त्याने बऱ्यापैकी जम बसवला.

आता त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडे कोण कोण जात होते, याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात गिरिजा राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील नाणेली येथील हरिश्चंद्र घाडी या बुवा विरुद्धही तक्रार केली आहे. हरिश्चंद्र घाडी याने कनिकाच्या बाहुल्या, अंगारे, धुपारे, टाचणी, लिंबू यांचा वापर केला आणि कच्चे मांस व जिवंत कोंबडा यांचाही वापर केला. त्याशिवाय गोमूत्र आणि विभूत पाण्यात मिसळून प्यायला दिले, अशीही तक्रार आहे.

Firoz Shaikh Arrested
Pune Gang Crime: टोळी युद्धाचे सावट; ठोंबरे टोळीतील 'स्काय' पिस्तुलासह जेरबंद

अंगणात खुर्चीवर बसूनच कारनामे

हरिश्चंद्र घाडी हा गावापासून जवळच एका ठिकाणी कामाला जातो. शक्यतो सोमवार, मंगळवार, गुरुवार या वारांना ही बेकायदेशीर कामे करतो. संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत त्याचे हे काम सुरू असते. आमिष दाखवणे, खोटे दावे करणे असे प्रकार तो करतो. विशेष म्हणजे आपल्या घरासमोरील अंगणात खुर्चीवर बसून हे सर्व कारनामे तो करत असतो. हरिश्चंद्र घाडी हा अनेक वेळा मुंबईला गेल्याचीही माहिती मिळाली आहे. ज्यावेळी तो अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करतो तेव्हा अनेक लोकांची गर्दी असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या बुवाचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी पुरेसे यश आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news