Firoz Shaikh Arrested | कोलगावातील भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक

Firoz Shaikh Arrested | गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांची कारवाई
Firoz Shaikh Arrested
Firoz Shaikh Arrested
Published on
Updated on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

माजी खा. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी आपल्यावरील झालेल्या अन्याय, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, आणि अघोरी कृत्या बाबतच्या गंभीर तक्रारीनंतर ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी तातडीने कारवाईची पावले उचलत या प्रकरणातील संशयीत सावंतवाडीतील भोंदू बाबा फिरोज आदम शेख (५३ रा. कोलगाव-फणसवाडी) याच्या ठाणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी त्याला ताब्यात घेत ठाणे गाठले.

Firoz Shaikh Arrested
Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खा. विनायक राऊत यांची सून व ठाणेतील नगरसेवक गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत हिने राऊत कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या तक्रारीत तिने आपल्यावर राऊत कुटुंबीयांनी अनेक पद्धतीने अत्याचार, कथित अघोरी प्रथा, काळी जादू आणि भोंदूर्गिरी केल्याचे सांगत अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.

या तक्रारीच्या आधारे ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई परिसरातील अनेक बाबांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत कोलगाव फणसवाडी येथील भोंदू बाबा फिरोज आदम शेख यांचेही नाव आहे.

या बाबाने गिरिजा राऊत हिच्यावर अघोरी करणी करणे, गोमूत्र प्राशन करण्यास देणे, लिंबू फिरवणे असे प्रकार केले आहेत. त्यावरून ठाणे पोलिसांनी त्याला शनिवारी संध्याकाळी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने कोलगाव फणसवाडी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले.

या बाबावर यापूर्वी सावंतवाडी पोलीस ठाण्यात कित्येक तक्रारी आहेत. स्थानिकांनी तर हा बाबा अघोरी करणी, कृत्य करत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात केल्या आहेत. बाबाने घरात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे बाहेरील कोणी आल्यास तातडीने तो आपल कृत्य थांबवतो, परिणामी पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही.

स्थानिकांनी तर त्याच्या बाबत अंधश्रद्धा पसरवत असल्याची तक्रार अनिस कडे केली होती. अनिसच्या कार्यकर्त्यांनीही त्याच्या घरात धडक दिली मात्र काहीच आढळून आले नव्हते. धार्मिक कारणावरून पोलिसांना या बाबाच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या मात्र त्या तडजोड करून मिटविल्या गेल्या मात्र या भोंदू बाबा वर अद्याप पर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

दहा वर्षांपूर्वी हा बाबा शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या डंपर वर चालक होता. त्यानंतर त्याने हे काम सोडून तो भोंदूर्गिरीची कामे करू लागला. दिवसरात्र त्याच्याकडे सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा, कर्नाटक येथून लोकांची रांग लागलेली असते. या अघोरी विद्येतून त्याने बरीच कमाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाचा तो कोलगाव प्रमुख पदी नियुक्त झाला होता.

त्यानंतर तो त्या पक्षाचे त्या भागातील काम ही पाहतो. या प्रकरणाच्या तपासादरम्यान भांडुपचे आबा राऊत, कोलगावचे फिरोज बाबा, राजापूरचे काझी बाबा, कुडाळ-नानेली येथील एकजण तसेच मुंबईतील कुर्ला परिसरातील एका मुस्लिम बाबाचे नावही समोर आले आहे.

Firoz Shaikh Arrested
Sindhudurg Crime : लग्न करू देत नसल्याने युवतीचा खून

संबंधित सर्वांची चौकशी सुरू असून, काहींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ठाणे पोलिसांकडून सर्व संबंधितांची कसून चौकशी सुरू असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर राऊत प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस कुडाळ-नानेली येथील संशयिताच्याही मागावर!

माजी खा. विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा आणि संपूर्ण कुटुंबावर झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील नानेली येथील गावातील संशयिताच्या घरापर्यंत ठाणे पोलिसांचे पथक चौकशीसाठी पोहोचले. मात्र पोलिसांना संशयित घरी सापडून आला नसल्याचे समजते.

Firoz Shaikh Arrested
Girija Raut allegations : गिरिजा राऊत छळ प्रकरण: भोंदू बाबा फिरोज शेखला पोलीस कोठडी

कुडाळ पोलीस स्थानकचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांनी सदर टीम आली होती, मात्र ती व्यक्ती सापडली नसल्याचे सांगितले. या प्रकरणात संशयिताची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून राहिले आहे.

माजी खा. विनायक राऊत यांच्या सुनेने आपल्या नवऱ्यासह सासू, सासरे, चुलत सासरे तसेच या बाबा विरोधात ठाणे येथे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आपला मोर्चा बाबाच्या दिशेने वळवला आहे.

सावंतवाडी येथील एका संशयित भोंदूबाबा ला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीसाठी ठाणे येथे नेले. त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यातील एका गावातील संशयिताच्या घरी गेले होता मात्र संशयित पोलिसांना घरी सापडून आलेला नाही. याबाबत कुडाळ पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्याप कुडाळ पोलीस ठाण्याच्या दप्तरी कोणतीही नोंद नाही. परंतु ठाणे पोलिसांची टीम तपासासाठी येऊन गेल्याचे सिंधुदुर्ग वाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news