नांदेड : बिहारीपूर येथे ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात पती- पत्नीसह मुलगा ठार | पुढारी

नांदेड : बिहारीपूर येथे ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात पती- पत्नीसह मुलगा ठार

मुक्रमाबाद; पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरूवारी (दि.२३) दुपारी दोनच्या सुमारास बिहारीपूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली. मोसीन गन्नीसाब शेख, फरीदा मोसिन शेख व जुनेद मोशीन शेख (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुखेड तालुक्यातील परतपूर वस्तीवाढ येथील मोसीन शेख हे पत्नी फरीदा व मुलगा जुनेद काही कामानिमित्त मुखेडला गेले होते.तेथील सर्व कामे आटोपून गावाकडे परत येत असताना दुपारी दोनच्या सुमारास बिहारीपूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्यावर काळाने झडप घातली. भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये मोसीन शेख व त्यांची पत्नी जागीच ठार झाले. तर मुलगा जुमेद याचा उपचारादरम्यान उदगीर येथे मृत्यू झाला. तिघांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दोन वर्षात अनेक तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Back to top button