सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा: शालेय शिक्षण घेताना मुलांसाठी "हॅप्पी सॅटर्डे" ही संकल्पना राज्यात राबविण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत मुलांना अभ्यास वगळून दर शनिवारी संगीत, नाट्य, कला याचे शिक्षण तज्ञ व प्रतिथयश कलाकारांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज (दि.१४) दिली. सावंतवाडी येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी झाला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Deepak Kesarkar
यापुढे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण "सक्तीचे" करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. सुरूवातीला अहमदनगर राजूर येथील सिद्धेश संतोष हंगेकर या दिव्यांग विद्यार्थ्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. Deepak Kesarkar
यावेळी एन.सी.आर.टी चे प्रा. टी.पी शर्मा, राज्य विज्ञान संस्था रवी नगर नागपूरच्या राधा अतकरी, शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, अखिल भारतीय शिक्षण संस्था सहसचिव म.ल. देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे अध्यक्ष काकतकर, बालभारतीचे कृष्णकुमार पाटील, डॉ. राजेंद्र कांबळे, राजकुमार अवसरे, प्रवीण राठोड, भोसले नॉलेज सिटीच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, नितीन सांडये, कैलास चव्हाण, अवधूत मालणकर, महेश चोथे, डॉ. आचरेकर, लक्ष्मीकांत बानते, रामचंद्र आंगणे, जयंत भगत, प्रसाद महाले, दीपक केसरकर मित्रमंडळाचे आबा केसरकर, नंदू गावडे, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प इंडिया हा उपक्रम राबविला जात आहे. येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून मुलांना शाळेबद्दल आकर्षण वाढावे यासाठी "हॅप्पी सॅटर्डे" ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेत अंतर्गत दर शनिवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास वगळून संगीत, नाट्य, कला आदी क्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. आगामी काळात पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना कृषी आणि स्काऊट गाईड शिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले नॉलेज सिटीचे श्री प्रभू व आरपीडीच्या उपप्राचार्य सुमेधा नाईक यांनी केले.
हेही वाचा