सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मंत्री दीपक केसरकर
Published on
Updated on

वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले शहर विकसित होत असून आणखी पर्यटनदृष्ट्या ही विकसित होण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. शहरातील विकास कामासाठी भरीव निधी दिला असून नवाबाग येथे सुंदर असे फिशिंग व्हिलेज करावयाचे असून महिलांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावयाचा आहे. शहराच्या सर्वागीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे दिली.

वेंगुर्ले शहरातील शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून मंजूर वेंगुर्ले शहरातील विकासकामांचे भूमिपूजन आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वेंगुर्ले नवाबाग येथे आयोजित सभेत मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी मच्छिमार बांधवांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, रुपेश पावसकर, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, सावंतवाडी खरेदी विक्री संघ व्हाईस चेअरमन राजेंद्र रेडकर, कोचरे सरपंच योगेश तेली, मितेश परब, माजी प. स. सदस्य समाधान बादवलकर, निलेश खडपकर, आनंद वेंगुर्लेकर, श्री रेडकर,श्री. मोजेस, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. महेंद्र गवाणकर, माजी नगरसेवक नागेश गावडे, वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर, न. प. अधिकारी आदींसह वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वालावलकर व नितीन मांजरेकर यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news